Tokyo Olympics 2020 : भारताचा विजयी चौकार; 'या' खेळांमध्ये पदकाच्या दिशेनं वाटचाल

 ऑलिम्पिकमधे आजचा दिवस भारतासाठी सकाळपासूनच आनंदाच्या बातम्या आणणारा आहे. बॅडमिंटनपटू पी,. व्ही सिंधूनं आपली विजयी घोडदौड सुरू ठेवलेय डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डला सहज नमवत सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय.  तिकडे भारतीय पुरुष हॉकी संघानं अर्जेंटीनावर ३-१ गोल फरकानं मात केलेय. गतवेळच्या विजेत्यांना लोळवल्यानं भारतीय संघाचं स्थान भक्कम झालंय इकडे तिरंदाजीच्या पुरुष एकेरी गटात भारताच्या अतानू दासचा  दासनं पुरुष एकेरीच्या अंतिम ८ जणांच्या गटात स्थान मिळवलंय. त्यानं गतविजेत्या तीरंदाजाला मात दिलेय. तर बॉक्सिगमध्येही भारतानं विजयी सुरुवात केलेय. सुपर हेवीवेट गटात सतीश कुमारनं विजयी सलामी देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आज सुपरमॉम मेरी कोमच्या सामन्याचीही अनेकांना प्रतीक्षा आहे तसंच गोल्फच्या मैदानात उदयन माने याचाही सामना असणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola