Nandu Natekar passed away : माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन, शरद पवार यांची श्रद्धांजली

अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू आणि १९६० च्या दशकातील भारतीय क्रीडा क्षेत्राचे हीरो असलेले नंदू नाटेकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. ते ८८ वर्षांचे होते. नंदू नाटेकर हे मूळचे सांगलीचे राहणारे होते. बॅडमिंडन क्रीडाप्रकारात त्यांनी भाराताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवलं. आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकणारे ते पहिले बॅडमिंटनपटू होते. भारत सरकारचा अर्जुन पुरस्कारानं सन्मानित होणारे ते पहिले क्रीडापटू होते. बॅडमिंटनप्रमाणे त्यांनी इतर खेळातही प्राविण्य मिळवलं होतं. क्रिकेट टेनिस या क्रिडाप्रकारातही त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजवल्या होत्या.  नंदू नाटेकर यांच्या निधनानंतर c यांनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola