TOKYO OLYMPIC 2020 चा सातवा दिवस संमिश्र यशाचा, सिंधू, अतानू आणि सतीशकुमारची आगेकूच
बॉक्सिंगमध्येही भारतानं बाजी मारली आहे. 91 किलोग्राम कॅटेगरीमध्ये सतीशनं क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. सतीश कुमारनं जमैकाच्या बॉक्सरला नमवत विजय मिळवला आहे. भारतासाठी सातव्या दिवसाची सुरुवात अत्यंत सकारात्मक झाली आहे. बॉक्सिंमध्येही पदक मिळण्याच्या आसा उंचावल्या आहेत.
धनुर्विद्येत अतनूचा विजय, अतनू आणि डेंग यांच्या काँटे की टक्कर दिसून आली. अखेर शेवटच्या शॉर्टमध्ये अतनूनं विजय मिळवला. अतनूनं तीन सेटमध्ये जिंकत सामना आपल्या नावे केला. अतनूनं धनुर्विद्येत भारताला पदक मिळवून देण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकलं आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघानं अर्जेंटीनावर मात करत 3-1 अशा फरकानं विजय मिळवला आहे. भारतानं अर्जेंटीनासारख्या मजबूत संघाला पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाकडून विजयाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारतानं ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या फॉर्मात आहे.