PV Sindhu EXCLUSIVE : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारी पीव्ही सिंधू 'माझा'वर

Continues below advertisement

PV Sindhu Wins Bronze Medal: पी व्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. सिंधूने रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या खेळाडूचा पराभव करुन ही कामगिरी केली. पी व्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. या ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे पदक आहे.

 

पी व्ही सिंधूने कांस्य पदकासाठीच्या सामन्यात चीनच्या बिंग जियाओचा पराभव केला. सिंधूच्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली आहे. सिंधूने सुरुवातीपासूनच या सामन्यावर वर्चस्व राखले आणि पहिल्या गेममध्ये चीनच्या खेळाडूचा 21-13 असा पराभव करून तिची पकड मजबूत केली. यानंतरही तिने चमकदार कामगिरी करत पदक आपल्या नावावर केले. त्यानंतर, तिने दुसऱ्या गेममध्येही चमकदार कामगिरी केली आणि पदक जिंकले. 52 मिनिटे चाललेल्या सामन्यात सिंधूने चिनी खेळाडू बिंगचा 21-13, 21-15 असा पराभव केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram