Hockey Team : पुरुष हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी, चार दशकांनंतर ब्रिटनला हरवून गाठली उपांत्य फेरी

Hockey, India Enters Semi-Finals: टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला आहे. ग्रेट ब्रिटनला 3-1 हरवून टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली. भारतीय पुरुष हॉकी संघाने चार दशकांनंतर ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली आहे. याआधी 1972 मध्ये पुरुष हॉकी संघाने ही कामगिरी केली होती. 

 

टोकियो ऑलिम्पिकचा आजचा 10 वा दिवस भारतासाठी खास आहे. भारताने आज आपल्या खात्यात दुसरं पदक जोडली आहेत. स्टार शटलर पीव्ही सिंधूने कांस्यपदक पटकावले. त्याने चीनच्या बिंग जियाओचा पराभव करून तिने ही कामगिरी केली. भारताच्या खात्यात आता दोन पदके आहेत. बॉक्सिंगमध्येही पदक निश्चित झालं आहे. महिला बॉक्सर लवलिना बोरगोहेनने उपांत्य फेरी गाठली आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola