Ronaldo Joins Man United: ख्रिस्तियानो रोनाल्डोचा Juventus क्लबला गुडबाय! मँचेस्टर युनायटेडमध्ये प्रवेश
Continues below advertisement
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोनं युवेंटस क्लब सोडून मँचेस्टर युनायटेडमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. यंदाच्या मोसमात क्लब सोडण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीच्या अवघे चार दिवस आधीच रोनाल्डोनं युवेंटसला गुडबाय केलाय. 2018 साली रोनाल्डो रिअल माद्रिद क्लबमधून युवेंटसमध्ये दाखल झाला होता. युवेंटससाठी त्यानं 81 सामन्यात 98 गोल नोंदवले होते. पण काही दिवसांपूर्वीच त्यानं युवेंटसकडून खेळण्यास इच्छुक नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज 12 वर्षांनी रोनाल्डो पुन्हा मँचेस्टर युनायटेडच्या ताफ्यात दाखल झाला आहे. या आधी 2003 ते 2009 दरम्यान रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडकडून खेळला होता.
Continues below advertisement