Zero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुरुवात मुंबईकरांची झोप उडवणाऱ्या मुसळधार पावसाची.. मुंबईतल्या धुवांधार पावसासह राज्यातल्या पावसाच्या बातम्या पाहणार आहोत.. मात्र, सुरुवात मुंबईपासून..
आठवड्याची सुरवातच मुंबईकरांच्या स्पिरीटला पुन्हा एकदा आव्हान देणारी ठरली.. कारण, रविवारी मध्यरात्री मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली.. अनेक भागात सोसाट्याचा वारा.. तर कुठे विजांचा कडकडाट... एखाद्या चक्रीवादळाची आठवण व्हावी असा पाऊस काही भागात कोसळत होता..
सकाळ होईपर्यंत पावसाचा जोर थोडा कमी झाला.. पण, आज दिवसभरात मुंबईकरांना सूर्यनारायणाचं दर्शनच झालं नाही.. कारण, काही मिनिटं पावसानं उसंत घेतली.. असली तरी मुबंईवर पावसाचे ढग होतेच..
आता इतका मोठा पाऊस झाला... की त्याचा परिणाम होणारच... आणि तसंच झालं.. आठवड्याची सुरुवात म्हणून कामावर जाण्यासाठी आज मुंबईकरांना चांगलीच धावपळ करावी लागली..
रात्रीच्या पावसानं सेंट्रलसह हार्बर लोकलसेवा विस्कळीत केली.. काही स्थानकांमधून गाड्या धिम्या ट्रॅकवर धावत होत्या... त्यामुळे अर्थाच स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी होती.. काही गाड्या तर अर्ध्या वाटेतच थांबवल्या गेल्या.. त्यामुळे लाखो नोकरदार वाटेतच अडकले.. मग, काय कामावर पोहोण्याचा शर्यतीत धावणारा मुंबईकर लोकल गाड्यासोडून रस्तेमार्गे निघाला.. तर उपनगरातून मुंबईत येणारे पूर्व आणि पश्चिम... असे दोन्ही महामार्ग जॅम झाले.. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली..
जीव मुठीत धरुन... मुंबईकरांनी कार्यलयं गाठण्याची शर्यंत जिंकली असली.. तर परतीची धाकधूक त्यांच्या मनात होती.. कारण, संध्याकाळपर्यंत मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता.. इतकंच नाही तर शहरातील आपत्ती व्यवस्थापनाचे कसे हाल झालेत... हेही त्यांनी पाहिलं होतं.. रस्ते जागोजागी तुंबले होते.. नालेसफाईचा कसा बोजवारा उडालाय.. हेही मुंबईकरांनी आज पाहिलं..
दुपारी तीनही लाईनवरच्या लोकलसेवा सुरु झाल्या होत्या.. याच पावसाचे पडसाद राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले... त्यावरुन आरोप प्रत्यारोपही झाले.