Pune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!

Continues below advertisement

Pune Hit and Run: पुणे : पुण्यातील (Pune News) पोर्शे हिट अँड रन (Porshe Hit And Run Case) प्रकरणानंतर पुन्हा एका हिट अँड रनच्या प्रकरणानं सगळीकडे खळबळ माजली आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बापोडीजवळ अज्ञात वाहनानं दोन पोलिसांना चिरडलं. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात मध्यरात्री झालेल्या हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खाली रात्री साधारणतः पावणे दोन वाजता हा अपघात घडला. खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलीस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले असताना, समोरून वेगानं आलेल्या चारचाकी वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram