सांगली : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यात पहिल्यांदाच उद्या लोखंडी पिंजऱ्यातील कुस्तीचा थरार
Continues below advertisement
स्वातंत्र्यानंतर तब्बल 70 वर्षांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच लोखंडी पिंजऱ्यातल्या कुस्तीचा थरार अनुभवता येणार आहे. यंदाचा उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आणि बेल्जियममध्ये सराव करणारा डब्ल्यूडब्ल्यूई पैलवान मनजीतसिंग यांच्यामधली ही कुस्ती उद्या सायंकाळी सहा वाजता सांगलीत खेळवण्यात येईल. सांगलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर या कुस्तीसाठी लोखंडी पिंजऱ्यात मातीचा आखाडा तयार करण्यात आला आहे. पैलवान-कुस्तीप्रेमी संघटनेच्या उद्धाटनाच्या निमित्तानं महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान मारुती जाधव यांनी या कुस्तीचं आयोजन केलं आहे. पाहा एबीपी माझाचे प्रतिनिधी कुलदीप मानेचा रिपोर्ट.
Continues below advertisement