Return Rain Effect | औषध फवारणीचा ट्रॅक्टर चिखलात अडकला | सांगली | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
परतीच्या पावसानं सांगली जिल्ह्यातही द्राक्षबागांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास जाऊ नये म्हणून शेतकरी युद्ध पातळीवर प्रयत्न करतायेत. पीकं वाचवण्यासाठी शेतकरी पिकांवर औषध फवारणी करतायेत. मात्र शेतात चिखल झाल्याने शेतकऱ्यांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतंय. औषध फवारणीचे ट्रॅक्टरच चिखलाता अडकून पडलेत. द्राक्ष बागांचे क्षेत्र मोठे असल्याने ट्रॅक्टरने औषध मारणे हाच पर्याय त्यांच्यासमोर आहे. मात्र फवारणीवेळी ट्रॅक्टर चिखलात रुतून बसल्याने औषध कसं मारायंचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.