Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?

Continues below advertisement

Hathras Stampede Incident : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव परिसरात आयोजित सत्संगात चेंगराचेंगरी झाली. मंगळवारी घडलेल्या या दुर्घटनेमध्ये 100 अधिक जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. एटाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश कुमार सिंह यांनी सांगितलं की, ही घटना पुलराई गावात एका सत्संगात घडली. बाबा भोले यांच्या या सत्संगामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. सिकंदरराव पोलीस स्टेशनचे एसएचओ आशिष कुमार यांनी सांगितलं की, चेंगराचेंगरीची घटना जास्त गर्दीमुळे झाली. 

थ्री पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा? (Who Is Bhole Baba)

भोले बाबा (Bhole Baba) यांच्या सत्संगात ही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील रतिभानपूर येथे नारायण साकार (Narayan Sakar) उर्फ भोले बाबा यांचा सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. भोले बाबा कोरोनाकाळातील सत्संगामुळे चर्चेत आले होते. त्यांनी कोरोनाकाळात 50 जणांसाठी सत्संगाचं आयोजन करत हजारो लोक गोळा केले होते. तेव्हा या बाबांची जोरदार चर्चा झाली होती. याचं आणखी एक कारण म्हणजे भोले बाबा थ्री पीस सूट घालू

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram