Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित,विधान परिषदेत काल झालेल्या शिवीगाळ प्रकरणी दानवेंचं निलंबन, दानवेंच्या निलंबनानंतर सभागृहात गोंधळ.
महिला सदस्यांसमोर अशा पद्धतीची भाषा वापरणं अयोग्य, अशानं महिलांना काम करणं कठीण होईल, विधान परिषदेत काल झालेल्या शिवीगाळ प्रकरणानंतर निलम गोऱ्हेंचं वक्तव्य.
विजय वडेट्टीवारांच्या दालनात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरेंसह अन्य नेत्यांनी लावली उपस्थिती.
विधानभवनाच्या लॉबीमधे देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये भेट, मला वाटल तुम्ही परत लिफ्ट मध्ये जाताय, आदित्य ठाकरेंची फडणवीसांना कोपरखळी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली शिवसेना आमदारांची बैठक, रात्री आठ वाजता सहयाद्री अतिथीगहावर होणार बैठक. सर्व आमदार आणि मंत्र्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना.
कौशल्य विकासाच्या जनजागृतीसाठी प्रशिक्षणार्थी दिंडीत सहभागी. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाही वारकऱ्यांच्या पेहरावात वारीत सहभागी.