स्पेशल रिपोर्ट : पुणे : सिगरेट ओढतानाच्या व्हिडीओची धमकी, 13 वर्षांच्या मुलाकडून लाखोंची लूट
Continues below advertisement
पुण्यात बिबवेवाडी परिसरात एका 13 वर्षाच्या मुलाला त्याच्याच मित्रांनी सिगरेट ओढण्यास देऊन, त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पब्लिश करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून वेळोवेळी तब्बल 7 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
दिवाळीपासून हा सर्व प्रकार सुरु होता. आईला घरातील दागिने न सापडल्यामुळे वडिलांनी विचारणा केली असता, हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन सोनारांना अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
रेवणसिद्ध शिलवंत आणि आदित्य वांद्रे, अशी अटक करण्यात आलेल्या सोनारांची नावे असून, त्यांनी दोघा अल्पवयीन मुलांकडून ते दागिने विकत घेतले आहेत.