Barfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

Continues below advertisement

सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

वाहतूक व्‍यवस्‍थापनाशी संबंधित अनुषांगिक कामे पूर्ण

जुहूपासून अंधेरी असा पश्चिम - पूर्व प्रवास करण्याची सोय उपलब्‍ध

हलक्या वाहनांना पुलावर वाहतुकीसाठी प्रवेश, अवजड वाहनांना बंदी

कसे जोडले दोन उड्डाणपूल?

सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल एका बाजुला 1397 मिलीमीटर व दुसऱ्या बाजुला 650 मिलीमीटर वरच्या दिशेने उचलण्यासाठी ‘हायड्रॉलिक जॅक’ आणि ‘एमएस स्टुल पॅकिंग’चा वापर करण्यात आला. त्याचबरोबर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूलाखाली पेडेस्टल (आधार देणारे खांब) वापरण्यात आले आहेत. एकूण दोन पेडस्टलचा आधार देत जोडणी करावयाचा भाग हा 1397 मिमी या उड्डाणपूलाचा गर्डर वर उचलण्यात आला आहे. त्यासोबतच सहा नवीन बेअरींगही त्या साच्यात बसविण्यात आल्या. पेडस्टलला देण्यात आलेले ‘बोल्ट’ हे सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूलाच्या पिलरशी जुळणे हे अतिशय महत्वाचे आव्हान होते. अवघ्या 2 मिमि जागेच्या अंतरामध्ये अतिशय अचुकपणे हे दोन्ही पेडेस्टल जुळवण्याचे आव्हान पूल विभागाचे अभियंता आणि सल्लागारांच्या तांत्रिक टीमने अतिशय नियोजनबद्धरीत्या व शास्त्रशुद्ध पद्धतीने जुळवून आणले. वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय), आय.आय.टी. आणि स्ट्रक्ट्रॉनिक्स कन्सलटिंग इंजिनिअर्स या तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली हे आव्हानात्मक काम पार पाडण्यात आले. 

सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोखले उड्डाणपूल यांचे एकमेकांना जोडले जाणारे गर्डर जुळवण्यासाठी काँक्रिटिंगचे काम हे पावसाने उघडीप दिल्याच्या काळात करणे आवश्यक होते. तसेच सदर काम झाल्यानंतर सुमारे सहा तास पाऊस न येणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन व सदर सहा तासांच्या काळात पाऊस आल्यास पर्जन्यरोधक शेडची विशेष व्यवस्थाही सदर ठिकाणी करण्यात आली होती. मात्र, ससहा तासांच्या कालावधीदरम्यानच नव्हे, तर त्यानंतरदेखील सुमारे 12 तास पाऊस आला नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram