ABP News

Nagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड

Continues below advertisement

नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने  बोगस शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईचे पैसे  लाटल्याचा धक्कदायक प्रकार पुढे आला आहे ...

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील हि घटना आहे .. 

2022-23 या  वित्तीय वर्षातील झालेल्या अतिवृष्टीसाठी राज्य शासनाने मदत म्हणून शेतकऱ्यांना  प्रति हेक्टर 13 हजार 600 रुपये मदत घोषित केली होती. मात्र नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात महसूल अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बोगस शेतकऱ्यांची  नावे  शासनाला सादर करत अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे पैसे परस्पर बोगस शेतकऱ्यांच्या नावे वळते केल्याचे शासकीय कागदपत्रांवरूनच सिद्ध झाले आहे

यासाठी मूळ शेतकऱ्याचा खसरा क्रमांकाचा वापर करण्यात आला असून लाभार्थी शेतकऱ्याच्या  खसरा क्रमांकावर बोगस शेतकऱ्यांचे नाव देण्यात आले व बोगस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे  पैसे वळवण्यात आले आहे

काही प्रकरणात बोगस शेतकऱ्यांच्या  नावासह शेतीची आराजी  वाढवून अधिकचे पैसे वळते करण्यात आले आहे

कुही तालुकयातील 50 टक्के यादी हि  बोगस असल्याचा दावा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भागेश्वर फेंडर यांनी केला आहे

हा कोट्यवधीचा घोटाळा असून याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक शेतकर्त्यांनी नागपूरच्या जिल्हाधिकर्त्यांकडे केली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram