पुणे: आता पिंपरीतही पे आणि पार्कच्या हालचाली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Mar 2018 10:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्य़ापाठोपाठ आता पिंपरी चिंचवडमध्येही रस्त्यावर गाड्या पार्क करायच्या असतील तर पैसे मोजावे लागू शकतील. कारण पिंपरी महापालिकादेखील आता पे अँड पार्कचा प्रस्ताव आणण्याच्या विचारात आहे. शहरात प्रशस्त रस्ते असूनही वाहनं वाहनधारक कुठेही आणि कशाही प्रकारे आपली वाहनं पार्क करतात. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यावर उपाय म्हणून शहरात पे अँड पार्कचा प्रस्ताव आणणार असल्याचं महापौर नितीन काळजे यांनी जाहीर केलंय.