✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Dharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यू

विजय साळवी, एबीपी माझा   |  27 Sep 2024 11:12 PM (IST)

 झीरो अवरमध्ये आजची आणखी एक मोठी गोष्ट. धर्मवीर टू या चित्रपटाची. या चित्रपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शकाच्या शब्दांमध्ये सांगायचं तर ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हेच चित्रपटाचं धर्मवीर टू चित्रपटाचं उपनाव आणि त्याचा गाभाही आहे. एक पत्रकार या नात्यानं ठाकरे या चित्रपटानंतर धर्मवीर टू चित्रपटाचाही मी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. या चित्रपटाच्या उपनावात असलेल्या साहेब या बिरुदावलीत आनंद दिघे आणि त्यांचे राजकीय पट्टशिष्य एकनाथ शिंदेही अभिप्रेत असावेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या बंडामागची कारणं आणि त्यांच्या आमदारांच्या त्याआधीच्या अस्वस्थतेमागची कारणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. अर्थात ती नाण्याची एकच बाजू आहे. एकनाथ शिंदे म्हणजे आनंद दिघेंचं प्रतिबिंब किंवा वारसदार असल्याचं ठसवण्याचाही प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. त्यासाठी मविआ सरकारच्या काळातल्या घटना आणि दिघेंच्या आयुष्यातल्या घटना यांची सांगड घालून हा चित्रपट पुढे सरकतो. उद्धव ठाकरे यांनी मविआत सहभागी होताना हिंदुत्वाला सोडचिठ्ठी किंवा तिलांजली दिली असा आरोप शिंदे गटाकडून बंडाच्या समर्थनासाठी करण्यात येतो. तोच अधोरेखित करण्यासाठी आनंद दिघेंच्या आयुष्यातल्या नाट्यमय घटनांचा आणि मविआ सरकारच्या काळातल्या घटनांचा वापर करून त्यावर चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यासह संजय शिरसाट, दादा भुसे, भरत गोगावले, शहाजीबापू पाटील, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई यांच्याही व्यक्तिरेखा आपल्याला चित्रपटाच्या पडद्यावर दिसतात. शिंदे गटाची मविआ सरकारच्या काळातली राजकीय अस्वस्थता ते मांडतात. संपूर्ण चित्रपटात उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांची व्यक्तिरेखा दिसत नाही. पण राऊतांचा प्रवक्ते म्हणूवन होणारा उल्लेख आणि उद्धव ठाकरेंचा नाव न घेता प्रसंगाला साजेसा होणारा उल्लेख हा त्यांचं अस्तित्व कथेतलं जाणवून देतो. ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या पडद्यावर न दिसणाऱ्या साहेबांची बाजू सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करताना दिसते. एक प्रेक्षक म्हणून हा चित्रपट प्रत्येकाला भावेल का हा प्रश्न आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचं उद्दिष्ट ठेवून हा चित्रपट बनवल्यानं त्याचा राजकीय परिणाम किती होईल, हीच माझ्यातल्या पत्रकारासाठी उत्सुकता आहे. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Dharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यू

TRENDING VIDEOS

Solapur Funeral : MNS पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, हजारोनागरिक सहभागी, कडेकोट पोलीस बंदोबस्त2 Hour ago

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा9 Hour ago

Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत10 Hour ago

Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून11 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.