Zero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appझीरो अवरमध्ये ब्रेकनंतर आपलं स्वागत.. आता चर्चा करुयात महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नव्या डिक्शनरीची... बरं, ही डिक्शनरी अशी आहे.. की त्यातले काही शब्द... आम्हालाही बीप करावे लागतायेत...
आता हेच बघा...
आपल्या परखड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तीची जेव्हा केव्हा चर्चा केली जाईल.. त्याच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा उल्लेख नक्की होईल.. पत्रकार म्हणून संजय राऊतांनी कारकीर्द सुरु केली.. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला.. जो आजही सुरुच आहे.. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये जे संजय राऊत देशानं पाहिलेत.. ते एकदम आक्रमक स्वरुपातच... मविआच्या फॉर्मेशनमध्येही त्यांची भूमिका महत्वाची होती..तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत... आणि अमित शाहांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत... अशा प्रत्येक विरोधी नेत्याला अंगावर घेण्यासाठी सर्वात पुढे असातात ते संजय राऊत..
पण, ते राऊत.. कधी कधी इतके आक्रमक होवून जातात की... त्यांना त्याचा फटकाही बसतो.. आता आजचंच उदाहऱण घ्या.. राजकीय पलटवार करण्याच्या नादात संजय राऊतांनी जी वक्तव्य केली.. त्यावरुन नवा संघर्ष पेटला.. इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांच्या डिक्शनरीतून एक एक नवा शब्द बाहेर आला... ज्यानं एक लक्षात आलं... की विरोधकांवर टीका करण्यसाठी राज्यात कोणत्याही शब्दांचा वापर केला जावू शकतो..... ही सगळी डिक्शनरी पाहणार आहोतच.. मात्र, सुरुवात करुयात संजय राऊतांच्या वक्तव्यानं..