हिंगोली : शाळेच्या स्वयंपाकगृहात तब्बल 60 साप सापडले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jul 2018 11:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हिंगोली जिल्ह्यातल्या पांगरा बोखारे गावातील शाळेच्या स्वयंपाकगृहात तब्बल ६० साप सापडल्याची घटना घडली आहे. यातील सर्व साप विषारी समजल्या जाणाऱ्या घोणस जातीचे आहेत. या प्रकारामुळे शाळेत एकच खळबळ उडाली. पण शिक्षक आणि ग्रामस्थांनी घाबरुन न जाता सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडलं. सर्पमित्र घटनास्थळावर दाखल व्हायच्या आधी अख्खा गाव शाळेत दाखल झाला होता. यावेळी सर्पमित्रांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला