Pakistan : पाकिस्तानात अघोरी तालिबानी कृत्य! सियालकोटमध्ये श्रीलंकन नागरिकाला जिवंत जाळलं
पाकिस्तानात एक अघोरी असं तालिबानी कृत्य घडलंय. ते म्हणजे पाकिस्तानी मजुरांनी श्रीलंकन मॅनेजरचे हात-पाय तोडून त्याला जिवंत जाळलंय. पाकिस्तानातील सियालकोटमध्ये हा धक्कादायक प्रकार काल दुपारी घडलाय. पाकिस्तानी क्रिकेट टीमचं साहित्य बनवणाऱ्या कारखान्यातील मजुरांनी हे अमानवीय कृत्य केलं. याप्रकरणी १०० जणांना अटक केलीए. जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या श्रीलंकन व्यक्तीचं प्रियांथा कुमारा असं नाव आहे. प्रियांथा यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर लावलेलं धार्मिक पोस्टर फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकलं. त्यामुळे फॅक्टरीतील मजुरांसह भडकलेल्या जमावानं हे संतापजनक कृत्य केल्याचं कळतंय. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केलाय. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरातून पाकिस्तानविरोधात प्रचंड रोष पाहायला मिळतोय.
























