COVID-19 Vaccin | गुड न्यूज! ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वी
Continues below advertisement
कोरोनाव्हायरस लस बनविण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठ मागच्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधात लस विकसित करण्याचे काम करत आहे. ऑक्सफर्डने पहिल्या स्टेजमध्ये केलेल्या लसीच्या मानवी परीक्षणाचे निकाल सकारत्मक मिळाले या संदर्भातील अहवाल द लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. ही लस कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी मानवी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते.
Continues below advertisement