Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरी

Continues below advertisement

विठ्ठल मंदिर संवर्धनाच्या कामात विठ्ठल गाभाऱ्यातील जुनी खराब झालेली मेघडंबारी बदलून .190 किलो चांदी वापरून तयार केलेल्या नव्या मेघडंबरीत विठ्ठल रुक्मिणी पुढील शेकडो वर्षासाठी विसावले . या चांदीच्या मेघडंबरिला अतिशय बारीक पुरातन पद्धतीचे नक्षीकाम हस्टकलेने केले आहे . समोरच्या बाजूला या नक्षिकामावर सोन्याचा मुलामा दिल्याने विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात शोभा आली आहे . 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन संवर्धन काम सुरू असताना पूर्वीच्या काळी बसवलेली मेघ डंबरी खराब झाली होती. त्यामुळे मंदिर समितीने नवीन मेघ डंबरी बसवण्याचा निर्णय घेतला होता. विष्णुदास कबीर महाराज यांनी यासाठी सागवानी लाकूड उपलब्ध करून मेघडांबारी बनवून दिली .   मराठवाड्यातील मोघरे या भक्ताने मेघ डंबरी साठी जवळपास 2 कोटी रुपयाची चांदी अर्पण केल्यावर या लाकडी मेघडंबरीवर 20 गेज जाडीच्या चांदी चां पत्रा बसविण्यात आला होता . यासाठी पुण्यात दीड महिना सुटे भाग बनवून मंदिरात आणून ते बसविण्यात आले . 
आज पहाटे  ही मेघ डंबरी विधिवत पूजन करून समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या उपस्थितीत बसवली. यामुळे देवाच्या गाभाऱ्यास पूर्वी प्रमाणे शोभा प्राप्त झाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram