TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवानखेडे स्टेडियमवर विश्वविजेत्या टीम इंडियाचा सत्कार सोहळा, सत्कारावेळी वानखेडे स्डेडियमवर हजारो क्रिकेटप्रेमींची गर्दी.
काल टीम इंडियाचा वानखेडेत दिमाखात सत्कार झाल्यानंतर आज BCCआयकडून व्हिडीओ ट्वीट. मैदानात खेळाडूंनी गायले वंदे मातरम गीत.
टीम इंडियाला पाहण्यासाठी चाहते चढले झाडांवर. मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळाली क्रिकेटची क्रेझ.
मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर भारतीय क्रिकेट संघांचं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांची प्रचंड गर्दी. गर्दीत मुंबईकरांनी दाखवली माणुसकी, एका रुग्णवाहिकेला जाण्यासाठी दिली जागा.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाचे पाच ते सहा नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार, 7 जुलै रोजी प्रवेश करणार असल्याची माहिती, मंत्री अतुल सावे आणि आमदार संजय शिरसाठ यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता.
चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या रघुवंशी व्यापार संकुल परिसरात मनसे नेत्यावर गोळीबार, अमन अंधेवार जखमी. अज्ञात युवकानं लिफ्ट जवळ झाडल्या गोळ्या, हल्लेखोर युवकाचा तपास सुरू.