अफगाणिस्तानातून अमेरिकनं सैन्य पूर्णपणे माघारी....Afghanistan मध्ये Taliban राज सुरू? ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAfghanistan Crisis : अमेरिकेनं अफगाणिस्तानातून आपलं सैन्य पूर्णपणे मागे घेतलं आहे. यूएस जनरल केनेथ एफ मॅकेंजी यांनी यासंदर्भात घोषणा केली. ते म्हणाले की, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी परतल्याची आणि अमेरिकन नागरिकांसह अफगाणी नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी सुरु केलेल्या लष्करी मोहिमेच्या शेवटाची घोषणा करतो. ते पुढे म्हणाले की, शेवटचं सी-17 विमान हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुपारी 3 वाजून 29 मिनिटांनी रवाना करण्यात आलं.
याव्यतिरिक्त अमेरिकेनं अफगाणिस्तानातून आपली राजकीय उपस्थितीही संपवली असून ती कतारमध्ये हलवण्यात आली आहे. न्यूज एजंसी एएफपीनं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांच्या हवाल्यानं ही माहिती दिली. ब्लिंकन म्हणाले की, अफगाणिस्तान सोडू इच्छित असलेल्या प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मदत करण्यास अमेरिका वचनबद्ध आहे.