BJP on Commissioner Bungalow| कोरोनाच्या संकटात आयुक्तांच्या बंगल्यावर 40लाखाचा खर्च का? भाजपचा सवाल
मुंबईतलं कोरोना संकट अजून पूर्णत: संपलेलं नाही, कोविड सेंटर, कोरोना योद्धांसाठी तरतूद, इतर सुविधांवर होणारा खर्चही वाढलेला आहे. आर्थिक मंदीचं संकटही घोघावतंय...पण, अश्या स्थितीत मुंबई महापालिका आयुक्तांनी आयुक्त बंगल्यावर 40 लाखांचा खर्च करणार आहेत. मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी पदभार घेतल्षानंतर काही दिवसांतच बंगल्याच्या दुरुस्तीकरता 40 लाखांचं टेंडर काढल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
यापूर्वी तीन वर्षापूर्वीच अजॉय मेहता आयुक्त असताना 50 लाखांचं टेंडर आयुक्त बंगल्याच्या दुरुस्तीसाठी काढले गेले होते. तीन वर्षातच पुन्हा 40 लाखांचं टेंडर काढावं लागतंय अशी काय दुरुस्ती आयुक्तांना बंगल्यात करायची आहे असा सवाल आता भाजप आणि इतर विरोधकांनी विचारलाय.




















