एक्स्प्लोर
Mahesh Kothe | महेश कोठेंचा राष्ट्रवादी प्रवेश होता होता का थांबला?शरद पवारांनी ट्वीट डिलीट का केलं?
सोलापूर/ मुंबई : सोलापूर महानगरपालिकेत मोठी राजकीय उलथापालथ काल झालेली पाहायला मिळाली. पालिकेत प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेला मोठा झटका बसला. विरोधीपक्ष नेते महेश कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं सांगत शिवसेनेला राम राम ठोकला. कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं. कोठे यांचा आज राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश होणार अशी चर्चा होती. शरद पवार यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून महेश कोठे यांचा प्रवेश झाला अशी पोस्ट देखील आली. मात्र नंतर ती पोस्ट डिलिट करण्यात आली. आज एकूणच महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशवरून अत्यंत नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. कोठेंचा राष्ट्रवादी प्रवेश मात्र झालाच नाही. त्यामुळं कोठे नेमके कोठे? असा सवाल उपस्थित होत आहे.
राजकारण
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
आणखी पाहा





















