एक्स्प्लोर
Ulhasnagar :जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित दादाच, उल्हासनगरमध्ये कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स
मुंबई आणि नागपूरनंतर उल्हासनगरमध्येही अजित पवारांचे बॅनर लागलेत.. जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादाच अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेत.. उल्हासनगरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेत.. जनतेच्या मनातील भावना आपण मांडल्याची प्रतिक्रिया बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. राज्याला अजित दादांसारखा सक्षम मुख्यमंत्रीच हवा असल्याचंही कार्यकर्त्यांनी सांगितलं.. या बॅनरचा आढावा घेत कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे प्रतिनिधी अजय शर्मा यांनी...
आणखी पाहा






















