Aaditya Thackeray Speech Thane : तुम्हाला जेलमध्ये भरणार म्हणजे भरणार, दिघेंच्या स्मृतीस्थळावर शपथ
Aaditya Thackeray Speech Thane : तुम्हाला जेलमध्ये भरणार म्हणजे भरणार, दिघेंच्या स्मृतीस्थळावर शपथ
ठाणे : ठाकरे गटाच्या मोर्चा (Thackeray Thane Morcha) आणि सभेला अखेर ठाणे पोलिसांकडून (Thane Police) परवानगी देण्यात आली आहे. रोशनी शिंदे प्रकरणात पोलिसांनी पक्षपातीपणा केला असा आरोप ठाकरे गटानं केला आहे. आणि त्याचा निषेध म्हणून शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली आहे, मात्र याचवेळी मोर्चासाठी काही अटी आणि शर्थीला देखील घालून दिल्या आहेत.
ठाण्यातील मोर्चाला दुपारी तीन वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. आदित्य ठाकरे, विनायक राऊत, जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत चव्हाण मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना सोमवारी संध्याकाळी मारहाण करण्यात आली. उद्धव आणि रश्मी ठाकरे यांनी मंगळवारी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली.