एक्स्प्लोर

Pandharpur Vitthal Rukmini Mandir : विठ्ठल रुक्मिणीला मेघडंबरीचा विसावा, पाहा EXCLUSIVE VIDEO

Pandharpur Vitthal Rukmini Mandir: पंढरपूर : पंढरपपूरमधील (Pandharpur News) विठुरायाच्या मंदिराला (Vitthal Rukmini Mandir) 700 वर्षापूर्वीचे रूप देण्याचं काम सध्या सुरु असताना आता देवाच्या दगडी गाभाऱ्यात नवीन मेघडंबरीमध्ये देव पुढील शेकडो वर्षांसाठी विसावणार आहे. मंदिर गाभाऱ्याचं काम करताना देवाच्या शेजारी बसवलेली पुरातन मेघडंबरी कुजून गेल्याचं समोर आलं होतं. यानंतर पुन्हा नव्यानं मेघडंबरी बनविण्याचा विषय आल्यावर वारकरी फडकरी संघाचे उपाध्यक्ष विष्णू महाराज कबीर यांनी ही मेघडंबरी देण्याचा संकल्प सोडला. यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं यासाठी लागणारे जुने सागवानी लाकूड आणून त्यात पूर्वीच्याच आकाराची मेघडंबरी बनविण्यास सुरुवात केली. 

गेले दीड महिना अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारण्यास सुरुवात केली. विठुरायाची मूर्ती मोठी असल्यानं त्याची उंची 9 फूट तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीची उंची कमी असल्यानं येथे 7 फूट उंचीची मेघडंबरी बनवून तयार झाली आहे. यावर अतिशय रेखीव असं नक्षीकाम करण्यात आलं असून यासाठी वापरलेले सागवानी लाकूड हे पाच फूट रुंदीचा बुंधा असणाऱ्या झाडापासून घेण्यात आलं आहे. हे लाकूड सर्व सिझनमध्ये राहिलेलं असल्यानं या सागवानी लाकडाचं आयुष्य किमान 500 वर्ष असल्याचा दावा मिलिंद कारंडे यांनी केला आहे. विठ्ठल मंदिरात पूर्वी ज्या पद्धतीनं ही मेघडंबरी होती, त्याच आकारात ही नवी मेघडंबरी बनविण्यात आली आहे. पहिली मेघडंबरी काढताना विष्णू महाराज कबीर यांनी देवापुढे नवीन मेघडंबरी देण्याचा संकल्प सोडला होता. यासाठी साधारण 60 घनफूट एवढं सागवानी लाकडाचा वापर करण्यात आला आहे. 

सध्या विठुरायाच्या मूळ रूपात आलेल्या दगडी गाभाऱ्यात केवळ विठूरायाची मूर्ती पाहायला मिळत आहे. आता देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीखालील दगडी सिहासनावर ही नव्यानं बनवलेली मेघडंबरी उभी केली जाणार असून यावर मंदिर समितीकडून चांदीचं काम केलं जाणार असल्याचं मंदिर समितीचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं. पूर्वीच्या मेघडंबरील चांदीही 20 गेज जाडीची होती. मात्र त्याला वारंवार हात लागून तिची झीज झपाट्यानं होत होती. कालांतरानं अनेक ठिकाणी ही बसवलेली चांदी फाटल्याचं चित्र दिसत होतं. त्यामुळे आता या मेघडंबरीवर 16 गेज जाडीच्या चांदीच्या पत्र्याचं आवरण केलं जाणार असून त्यामुळे मेघडंबरीवरील चांदीही पुढील वर्षानुवर्ष व्यवस्थित राहील, असा दावा कार्यकारी अधिकारी शेळके यांनी केला आहे. 

आता लाकडी मेघडंबरीचं काम पूर्ण झाल्यानं त्याच्यावर पॉलिशिंग, इतर आयुष्य वाढवणारे लेप दिल्यावर चांदी बसवण्याच्या कामास सुरुवात होणार आहे. देवाचं चरणस्पर्श दर्शन जरी 2 जूनला सुरु होणार असलं तरी आषाढी सोहळ्यापूर्वी गाभाऱ्यात मेघडंबरी बसविण्याचं काम पूर्ण होईल, असं शेळके यांनी सांगितलं आहे.

Solapur व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Embed widget