Ramdas Kadam : रामदास कदम यांना शिवसेनेचा आणखी एक झटका,कदम गटांच्या पदाधिकाऱ्यांना हटवलं ABP MAJHA
शिवसेनेनं माजी मंत्री रामदास कदम यांना आणखी एक झटका दिलाय. दापोली, मंडणगड नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शिवसेनेनं रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांच्या निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांना नारळ दिलाय. कदम गटाचे पंख छाटताना शिवसेना नेत्यांनी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना पुन्हा बळ दिलंय. कारण नव्यानं नियुक्ती केलेले पदाधिकारी सूर्यकांत दळवी यांच्याशी जवळीक असलेले आहेत. पालकमंत्री अनिल परब यांनी जिल्हा दौऱ्यात सूत्रं फिरवली आणि कदम समर्थक पदाधिकाऱ्यांना डच्चू दिला. अनिल परब यांच्याविरोधातील कदम यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे अडचणीत आलेल्या कदम यांचं विधान परिषदेचं तिकीट आधी कापलं गेलं आणि आता त्यांच्या समर्थकांना दूर करण्यात आलं.






















