Pune OBC Meeting: राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक ABP Majha
राज्य मागासवर्गीय आयोगाची ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला अंतरिम अहवाल देण्यासाठी अखेरची बैठक आज होणार आहे. या बैठकीत अंतरिम अहवाल पूर्ण केला जाणार असून तो मुख्यमंत्र्याना सादर करण्यात येणार आहे. ((आज आयोगाची पुण्यातील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. या बैठकीत शासनाने दिलेल्या आकडावारी आज आयोगाच्या सदस्यांनी पडताळून पाहिली. महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या आठ विभागांकडून देण्यात आलेली ही माहिती आहे. मात्र अंतरिम अहवाल तयार करण्याचे काम आज वेळेअभावी पुर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे उद्या पुन्हा अकरा वाजता बैठकीला सुरुवात होईल आणि दुपारपर्यंत अंतरिम अहवाल तयार करण्याचे काम पुर्ण होईल. ))((सोमवारी म्हणजे सात तारखाला आयोगाकडून हा अहवाल मुख्यमंत्र्याना सादर करण्यात येईल. त्यानंतर तो आठ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येईल





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
