MNS Warning to Sambhaji Brigade Pravin Gaikwad : .. तर पुण्यात फिरणे मुश्किल करु : Vasant More
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, ' राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला असा आरोप केला होता'. त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी ' राज ठाकरेंना पुरंदरे यांच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही' अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता संभाजी ब्रिगेड आणि मनसेत संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुकवर यासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात '2019 च्या लोकसभेला पुण्यातून इच्छुक असणारे प्रवीण गायकवाड, मी स्वतः पाहिलय तुला, गल्लोगल्ली फिरत सांगत होतास की मी प्रवीण गायकवाड, मी प्रवीण गायकवाड, अरे तुला राज ठाकरे काय कळणार, लायकीत राहायचे नाही तर पुण्यात फिरणे मुश्किल करू' अशा शब्दात प्रवीण गायकवाड यांच्यावर टीका केली आहे. तर मनसेच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रवीण गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्याप्रकारे सोशल मीडियावर संभाजी ब्रिगेड आणि मनसेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वार सुरू आहे ते पाहता येत्या काही दिवसात या दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.