Mumbai Drugs Case : किरण गोसावीच्या असिस्टंटला अटक, पुण्यातील तरुणांची फसवणूक केल्या प्रकरणात कारवाई
क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Party )शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) अटक प्रकरणात एनसीबीने (NCB) साक्षीदार बनविलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) विरोधात एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर केळवे सागरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर निघाले आहेत.
जिल्ह्यातील एडवण येथील उत्कर्ष तरे व आदर्श किणी ह्या दोन तरुणांना मलेशिया येथें नोकरी देतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपयेची रक्कम गोसावी यांनी बँक खात्यामार्फत घेतली होती. त्याच्या नवी मुंबई येथील के पी इंटरप्राईजेस या कार्यालयातून तो आपली सूत्रे हलवत होता. या दोन मुलांना तिकीट आणि व्हिसा दिल्यानंतर ते विमानतळावर गेल्यावर तिकीट आणि व्हिसा बनावट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर दोन्ही तरुणांनी केळवे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. तरुणांकडे असलेले भक्कम पुरावे पाहता आरोपी किरण गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्य न दाखविल्याने त्या दोन्ही तरुणांचा तक्रारी अर्ज केळवे पोलीस ठाण्यात धूळ खात पडून होता.
![Pune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4a445057d0dde54a120ac85ab5ec8e461739266511456718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rushikesh Sawant : Tanaji Sawant यांचा मुलगा ऋषिकेष सावंत पुण्यात परतला, नेमकं प्रकरण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/93824e1273ba1cac78f690debb6fea051739242747201718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vastav 127 Pune :आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावीत जागा बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/76b030ff504898baebbbb996ea1931c21738928723247718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/116cd530074c15bf7868c19823f2f3481738214113190718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/f38c1a0020e0a3e99f28277d5730d2791738210178849718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)