एक्स्प्लोर

Vaishali Darekar Dombivli Fire :जिवंत ज्वालामुखीच्या तोंडावर डोंबिवली वसवली; वैशाली दरेकर संतापल्या

डोंबिवली: डोंबिवलीतील एमआयडीसीमधील इंडो अमाईन्स (Indo Amines) कंपनीत आग लागल्याची घटना समोर येत आहे. यावेळी अनेक स्फोटांचे आवाजही येत असल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट झाली आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. सध्या या कंपनीच्या आतमधे कुणीही अडकलं नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

या घटनेनंतर बाजूला असणाऱ्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घरी पाठवण्यात आलं आहे. आजूबाजूच्या परिसरातील कारखान्यातील कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. आग लागलेल्या इंडो अमाईन्स कंपनीच्या परिसरात अनेक विविध कारखाने आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. सदर घटनेनंतर परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. गेल्या काही दिवासांमध्ये डोंबिवलीतील एमआयडीमध्ये आगीच्या अनेक घटना घडत आहे. मात्र यानंतरही राज्य सरकारने धडा घेतला नाहीय का?, अशा सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

डोंबिवली एमआयडीत अनेक केमीकल कंपन्या आहेत. साधारण 15 दिवसांपूर्वीच या एमआयडीसीमधील अभिनव कंपनीत एक मोठा स्फोट झाला होता. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा आग लागल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसल्याचे दिसून येत आहे. विविध कंपन्यांनी तातडीने सगळ्या कामगारांना सुरक्षित पणे बाहेर काढण्यात आले.

आगीबाबत लेटेस्ट अपडेट काय?

सदर घटनास्थळी मानपाडा पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचारी ०१-रुग्णवाहिकेसह उपस्थित आहेत. सद्यस्थितीत घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही. 

सदर घटनास्थळी उपस्थित अग्निशमन दलाचे वाहने पुढीलप्रमाणे:-
१) डोंबिवली एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे जवान ०२-वॉटर टेंडरसह उपस्थित आहेत.
२) कल्याण अग्निशमन दलाचे जवान ०२-फायर वाहनासह उपस्थित आहेत.
३) पलावा एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह उपस्थित आहेत.
४) ठाणे अग्निशमन दलाचे जवान ०१-हायराईज फायर वाहनाचा उपस्थित आहेत.

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

सदर घटनेला यंत्रणाच जबाबदार आहे. यावेळी कोणाचं सरकार आहे, कोणाचं नाही, हा प्रश्न नाही. अशा घटनेमुळे नाहक नागरिकांचे जीव जात आहेत. आता जेवढ्या एमआयडीसी आहेत, त्याचं ऑडिट झालं पाहिजे, एक स्वतंत्र्य यंत्रणा स्थापन केली पाहिजे, असं भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले.

वैशाली दरेकर काय म्हणाल्या?

डोंबिवली ज्वालामुखीच्या तोंडात वसवली गेलीय की काय?, असं आम्हाला आता वाटू लागलं आहे. फायर ऑडिट केलं होतं का?, कंपनीने योग्य ती सुरक्षा यंत्रणा होती का?, असे विविध प्रश्न समोर येत आहे, असं ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर म्हणाल्या.

राजकारण व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : पोलीसच झाले दरोडेखोर! पुणे ग्रामीण पोलिसांचा कारनामा समोर, खंडणीनंतर टाकला दरोडा, सहा आरोपी फरार 
Pune Crime : पोलीसच झाले दरोडेखोर! पुणे ग्रामीण पोलिसांचा कारनामा समोर, खंडणीनंतर टाकला दरोडा, सहा आरोपी फरार 
Horoscope Today 27 July 2026: आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ठाण्यात शिंदे -आव्हाड एकत्र! आम्ही सुद्धा तुमचेच, लोकांच्या हितासाठी हातात हात घालून काम करु, आव्हाडांचं सूचक वक्तव्य 
ठाण्यात शिंदे -आव्हाड एकत्र! आम्ही सुद्धा तुमचेच, लोकांच्या हितासाठी हातात हात घालून काम करु, आव्हाडांचं सूचक वक्तव्य 
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget