Reactions On Lalit Patil Case : ललित पाटीलवरुन आरोपांचा सामना, विरोधकांकडून चौकशीची मागणी
abp majha web team
Updated at:
21 Oct 2023 05:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appललित पाटीलप्रकरण जसजसं पुढे सरकत जातंय तस तसे नवे पत्ते उलगडू लागलेत. आता याप्रकरणी नाशिकमधल्या सराफा व्यापाराची चौकशी होणार आहे. ड्रग्जच्या पैशातून भूषण पाटीलने सोनं खरेदी केल्याचं उघड झालंय. भूषण पाटीलनं या सराफाकडून ८ किलो सोनं जप्त केलं.तर दुसरीकडे ललितचा साथीदार असलेला रेहान शेखला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर नाशिकमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेल्या ड्रग्ज फॅक्टरीत ललित पाटीलला आणण्याची शक्यता आहे... नाशिकमध्ये मुंबई पोलिसांनी उद्धध्वस्त केलेली फॅक्टरी ही ललितचा भाऊ भूषण चालवत होत असल्याचंही समोर आलंय