Maharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Budget  2024 : बजेटमधून सर्वसामान्य नागरिकांना काय मिळालं?  पाहा रिपोर्ट

 

हे देखील वाचा

''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला

मुंबई : राज्य सरकार महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणत असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे. पण, लेकींची काळजी करताना लेकाची काळजीही करावी. त्यासाठी सरकारने 'लाडका भाऊ' किंवा 'लाडका पुत्र' अशी योजनादेखील सुरू करावी, अशी मागणीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. ते शुक्रवारी राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तर, अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प (Budget) सादर केल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली असून लोकसभेला जो दणका दिला, त्यानंतर हे बजेट समोर ठेवल्याचं ठाकरेंनी म्हटलं. तसेच, देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) नेरेटीव्हवरुन होणाऱ्या टीकेलाही त्यांनी बजेट प्रतिक्रियेतून उत्तर दिलंय.

जनतेनं लोकसभेला जो दणका दिला त्यानंतर राज्य सरकारने हे बजेट समोर ठेवलं आहे, पण जनता यांच्या भुलथापाला बळी पडणार नाही. काहीतरी धुळफेक करायची, जनतेला लुबाडायचं काम हे सरकार करत आहे. थापांचा महापूर, आश्वासनाची अतिवृष्टी म्हणजे आजचा अर्थसंकल्प आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत बोलायचं झालं तर खोटं नेरेटिव्ह पसरव्याचं काम या बजेटमधून केलं आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर टोला लगावला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram