Raosaheb Danve Meet Arjun Khotkar : रावसाहेब दानवेंनी खोतकरांच्या घरी जाऊन घेतली भेट

Continues below advertisement

जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आज सकाळी सकाळी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची घरी जाऊन भेट घेतली त्यामुळे या दोघांमधील वाद संपुष्टात आल्याच बोललं जातंय, गेल्या काही दिवसापासून शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवे यांच्या वर नाराज होऊन स्वतःला दानवे यांच्या प्रचारापासून दूर ठेवत असल्याचं चित्र मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत होतं, दरम्यान आज सकाळी दानवे यांनी खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी भेट देऊन खोतकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला दरम्यान या दोघानी यावर प्रतिक्रिया दिली असून आपण आपली नाराजी दानवे पुढं व्यक्त केली असून पक्षातील वरिष्ठ सोबत आपण या याबाबत बोलू अस म्हटलंय, तर रावसाहेब दानवे यांनी कामाच्या व्यापामुळे दोघांची भेट  शक्य झाली नाही मात्र कोतकर यांची नाराजी दूर झाली असून ते उद्यापासूनच माझ्यासोबत प्रचाराला लागतील असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram