ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेच्या तुलनेत अजितदादांच्या राष्ट्रवादीची कमी मतं भाजपला मिळाली, एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट...

तिढ्यातल्या जागांवर चर्चा करण्यासाठी महायुतीच्य़ा प्रमुख नेत्यांची आज रात्री मुंबईत बैठक...९० जागांवरचा तिढा सुटणार का याकडे लक्ष...

किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्यांच्या अब्रूनुकसानी प्रकरणी संजय राऊतांना कोर्टाचा दणका... १५ दिवसांचा कारावास, २५ हजारांच्या दंडाची शिक्षा...पण अपिलासाठी तीस दिवसांची मुदत देत जामीन मंजूर... 

गंज, चुकीचं डिझाईन आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे मालवणमधला शिवरायांचा पुतळा कोसळला...चौकशी समितीच्या अहवालात ठपका...दोषींवर काय कारवाई होणार याकडे लक्ष...

पुतळा दुर्घटनेप्रकरणी आमदार वैभव नाईकांना पोलिसांची नोटीस...भ्रष्टाचार समोर आणल्याने नोटीस, नाईकांचा टोला...सत्य बोलतात तर नोटीस येणारच, राऊतांचाही हल्लाबोल...

अक्षय शिंदेच्या वडिलांचे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना पत्र, कुटुंबीयांना आणि वकिलांना सुरक्षा देण्याची मागणी, सत्ताधाऱ्यांकडून जीवाला धोका असल्याचा दावा...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द, मेट्रोची नवी लाईन कधी सुरु होणार असा प्रश्न, काही दिवसांतच मोदींचा पुन्हा दौरा होण्याची शक्यता...

छगन भुजबळ यांना अचानक अस्वस्थ वाटू बॉम्बे हॉस्पिटलमध्ये केलं दाखल... विशेष विमानाने पुण्याहून मुंबईला आणलं...

लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी दांपत्याचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, तर अहमदनगर जिल्ह्यात जलसमाधीचा इशारा दिलेले दोन आंदोलक बेपत्ता..

जामखेडच्या कुसडगावचं एसआरपीएफ केंद्र लोकार्पण ठरलं वादग्रस्त... रोहित पवार आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं... ((गृहमंत्री फडणवीस आणि राम शिंदेंविरोधात घोषणाबाजी...)) अनिल देशमुखांच्या हस्ते शेजारील मंडपात पार पडलं लोकार्पण.. 

राज ठाकरे दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर.. जिल्हाप्रमुखांची घेणार बैठक...विदर्भातून पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता... 

भाजपनं विद्वान असल्याच्या थाटात पक्ष फोडले, शिवसेना,राष्ट्रवादीची खुर्द आणि बुद्रूक झाले...माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी उडवली खिल्ली..

एमपीएससीच्या परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश.. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची राज्य सरकारकडून दखल.. 

मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन...तात्काळ दर्गा खाली करण्याची सूचना...आरोपीविरोधात गुन्हा दाखल...

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram