Nashik Long March :शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करा,त्यांना मुंबईपर्यंत येऊ देऊ नये,सभागृहात चर्चा
नाशिकवरून मुंबईकडे निघालेलं लाल वादळ मुंढेगावावरुन थोड्याच वेळात निघणार आहे... मोर्चा सुरु होण्याची लगबग सुरु आहे. एकीकडे राज्य सरकारचं अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे सर्वसामान्यांनी त्यांच्या किमान मागण्यांसाठी एल्गार पुकारलाय एकीकडे जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उसलंय तर त्यामुळे राज्यभरातील सर्वसामान्य जनतेची सरकारी कामं रखडायला सुरुवात झालेय.. एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचं टेन्शन असताना दुसरीडे असतानाच आता सरकारपुढे शेतकऱ्यांच्या लाल वादळानेही मोठं आव्हान उभं केलंय. नाशिकहून निघालेला हजारो शेतकऱ्यांचा जत्थाच्या जत्था चालत मुंबईच्या दिशेने सरकतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निरोप पाठवला तरी, आता माघार नाही... असा निर्धारी पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे सरकारच्या एका बाजूला कर्मचारी संपाचा आड आहे तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या मोर्चाची विहिरही आहे. यातून मध्यममार्ग काढण्याचं आव्हान सरकारपुढे आहे.





















