Manoj Jarange Sabha : पहाटेची वेळ आणि कडाक्याच्या थंडीमुळे मनोज जरांगेंनी पाच मिनिटांत भाषण आटोपलं
abp majha web team
Updated at:
16 Nov 2023 09:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनोज जरांगे यांची आज पहाटे चार वाजता करमाळा तालुक्यातील वांगी इथे सभा पार पडली. बुधवारी संध्याकाळी सात वाजता होणाऱ्या सभेला पोहोचण्यासाठी जरांगेंना पहाटेचे चार वाजले. तरीही थंडीत कुडकुडत हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सभेसाठी थांबले होते. जरांगे देखील समाजाचं प्रेम पाहून भारावून गेले आणि आरक्षण आंदोलनातील ही सभा मराठा समाज कधी विसरणार नाही असं सांगितलं. पहाटेची वेळ आणि थंडीच्या कडक्यामुळे जरांगे यांनी पाच मिनिट बोलून निरोप घेतला. यावेळी राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.