ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

100 टक्के काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल,  बाळासाहेब थोरातांकडून कार्यकर्त्यांसमोर विश्वास व्यक्त, तर ठाकरे मुख्यमंत्री बनणं ही तेव्हाची गरज होती, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य...

राज्यातील १५ ते २० जागांवरुन उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षात पेच..जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी मातोश्रीवर बैठक...

भाजपा १६०जागांसाठी आग्रही राहणार, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून १२६ ते १२८ जागांसाठी तयारी, अजितदादांची ७० जागांसाठी डिमान्ड

मनसेच्या व्हिजन वरळीचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण देणार, मनसेच्या संदीप देशपांडेंची माहिती, काका-पुतण्यामधल्या राजकारणाची मुंबईभर चर्चा

दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोच्या घरांची लॉटरी निघणार... . वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर, नेरूळ रेल्वे स्थानकाशेजारी ४० हजार घरांसाठी लॉटरी

ज्येष्ठ नागरिकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा,ज्येष्ठांना मालडब्यातून प्रवासाची मुभा, लोकलमध्ये स्वतंत्र डबा देण्याचे आदेश

अश्विन-जडेजाच्या झुंजार भागीदारीने चेन्नई कसोटीत भारताला सावरलं, बांगलादेशविरुद्ध सहा बाद १४४ वरुन सहा बाद ३३९ पर्यंत मजल, अश्विनचं नाबाद शतक, जडेजाचीही शतकाकडे कूच

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram