Kashmir Terrorists : काश्मीरमध्ये गावकऱ्यांनी पकडले दोन दहशतवादी, पोलिसांना केलं स्वाधीन ABP Majha
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाच्या दोन सशस्त्र दहशतवाद्यांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दहशतवाद्यांमध्ये राजौरी जिल्ह्यातील रहिवासी लष्कर कमांडर तालिब हुसैन आणि पुलवामा जिल्ह्यातील फैजल अहमद दार यांचा समावेश आहे. दोघांना तुकसन गावात पकडण्यात आले. नुकत्याच झालेल्या आयईडी स्फोटांचा फैजल हा मास्टरमाईंड होता.त्यांच्याकडून दोन एके रायफल, सात ग्रेनेड आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आलेय. पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी गावकऱ्यांना त्यांच्या शौर्याबद्दल २ लाख रुपयांचे रोख बक्षीस तर जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही धाडसी गावकऱ्यांना ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विशेष म्हणजे तालिब हुसैन हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
















