Karnataka Assembly Election Result Live : भाजपणं आत्मपरीक्षण करावं, खासदार अरविंद सावंत यांचा सल्ला
abp majha web team
Updated at:
13 May 2023 01:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कर्नाटक पिंजून काढलेल्या काँग्रेसला मतदारांनी अभूतपूर्व कौल दिला आहे. काँग्रेसने कर्नाटकात जोरदार मुसंडी मारली असून एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर काँग्रेस 118 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान भाजपकडून आमदार फोडाफोडीचा आजवरचा देशातील इतिहास पाहता काँग्रेसकडून अत्यंत काळजीपूर्व पावले उचलली आहेत. आमदारांना आजच (13मे) सायंकाळी बंगळूरमध्ये एकत्र करण्याचा निर्णय घेत काँग्रेसने हैदराबादमध्ये रिसॉर्ट बुक केले आहे. काँग्रेस नेते बीके हरिप्रसाद यांनी एबीपी न्यूजला दुजोरा दिला असून त्याचे कारणही दिले.