Ajit Pawar On Jitendra Awhad : महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरू : अजित पवार : ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वातील सरकारकडून पोलिसांचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप करत सध्या राज्यात गलिच्छ प्रकार सुरू असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. आव्हाड यांनी राजीनामा न देण्याचे आवाहनही पवार यांनी केले.















