Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत सांगली, भिवंडीसह मुंबईतील तीन जागांवर तिढा कायम : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडीत सांगली, भिवंडीसह मुंबईतील तीन जागांवर तिढा कायम आहे. ठाकरे गटाने परस्पर सांगलीचा उमेदवार जाहीर केल्याचं मविआतील ठाकरे गटाचे मित्रपक्ष काँग्रेस आणि पवार गटाने म्हटलं.. ठाकरे गटाकडून सांगलीसाठी चंद्रहार पाटलांना उमेदवारी देण्यात आली.. सांगली, भिवंडी, मुंबईतील काही जागांसाठी काँग्रेस अजूनही आग्रही आहे.. मविआची आज सकाळी ११ वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. मुंबईच्या मंत्रालय परिसरातील ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात ही संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.. यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम फार्मुला जाहीर केला जाणार आहे. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांसह उर्वरित जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवेल याचीही माहिती या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे.