Nana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

Continues below advertisement

Nana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharshtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहेत. विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असाच सामना रंगणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जागावाटपावरून चर्चा सुरु आहेत. त्यातच आता महाविकास आघाडीत विदर्भातील 62 जागांपैकी 29 जागांचे जागावाटप ठरल्याचे समोर येत आहे. 

विदर्भातील 62 विधानसभेच्या जागांपैकी 29 जागांवर महविकास आघाडीतील जागावाटपाचा कोणताच वाद नसल्याची माहिती मिळत आहे. या 29 जागांवर तीन पक्षांपैकी एकाच पक्षाने मागणी केल्याने त्या पक्षासाठी ती जागा सुटायला मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे विदर्भातील 29 विधानसभा मतदारसंघांचे महाविकास आघाडीतील जागावाटप निकाली निघाल्यात जमा आहे. 

'या' मतदारसंघांवर एकाच पक्षाचा दावा

यात नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, कामठी, दक्षिण पश्चिम नागपूर , पश्चिम नागपूर , उत्तर नागपूर, मध्य नागपूर विधानसभा जागांचा समावेश आहे. तर भंडारा जिल्ह्यातील साकोली, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, वर्धा जिल्ह्यातील देवळी, वाशीम जिल्ह्यातील रिसोड अशा प्रत्येकी एक विधानसभेचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा, अमरावती, मोर्शी व बडनेरा या चार  विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या एकाच घटक पक्षाने दावा केला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, ब्रम्हपुरी, चिमूर, राजुरा व वरोरा याचा पाच  विधानसभेवर एकाच पक्षाने दावा केला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर, अकोला व अकोला पूर्व या विधानसभेचा समावेश आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी ,राळेगाव,उमरखेड या विधानसभांच्या समावेश आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर,खामगाव व शिंदखेडा राज या तीन विधानसभांचा समावेश आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram