एक्स्प्लोर
Water Issue in Nashik | नाशिककरांच्या पाणीवापरात दरडोई 15 लिटरने कपात होण्याची शक्यता | ABP Majha
नाशिककरांच्या पाणीवापरात दरडोई १५ लिटरने कपात होण्याची शक्यता आहे. जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नव्या नियमानुसार कपात केली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि महापालिकेत करार होणार आहे. या कराराचा मसुदा येत्या महासभेl मांडला जाणार आहे. गेल्या ८ वर्षापासून महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात वाद आहे. या आधी नाशिक्काराना १५० लिटर दरडोई वापर अनुसरून पाण्याचे आरक्षण दिले जात होते. मात्र नव्या नियमानुसार यापुढे १३५ लिटर पाणी वापराची मर्यादा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या महासभेत विरोधक आणि सत्तधारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
महाराष्ट्र
नाशिक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















