Nashik Custom Office : नाशिकच्या जानोरी कस्टम ऑफीसबाहेर कांद्याचे कंटनेर उभेच : ABP Majha
शनिवारी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला खरा. पण या निर्णयाआधीच अनेक व्यापाऱ्यांचा माल निर्यातीसाठी रवाना झाला होता. तसेच रविवारी सुट्टीचा दिवस आल्याने मुंबई जेएनपीटी पोर्ट बाहेर तसेच नाशिकला जानोरीच्या कस्टम ऑफिस बाहेर शेकडो कंटेनर उभे असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून दिली जातेय. आता या कंटेनरमधील कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागणार का ? पुढे काय दर या कांद्याला मिळणार ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत स्पष्टता किंवा माहिती निर्यातदार किंवा व्यापाऱ्यांना दिली जात नसल्याने संभ्रम वाढलंय
एका कंटेनरमध्ये 30 टन म्हणजे 30 हजार किलो कांदा माल असतो. यावरून किती कांदा निर्यातीसाठी थांबल्याच अंदाज येतो.






















