एक्स्प्लोर
Nashik Onion : नाशिकमधील कांदाकोंडी कधी फुटणार? , व्यापाऱ्यांची आज बैठक : ABP Majha
आता बातमी आहे कांद्यासंदर्भातली. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या बंदचा आज सलग तिसरा दिवस आहे. बुधवारपासून कांद्याचे लिलाव पूर्णपणे ठप्प आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी काल व्यापारी प्रतिनिधींची बैठक घेतली, मात्र ती निष्फळ ठरली. दरम्यान, सरकारनं व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा देखील उगारला आहे. कांदा व्यापाऱ्यांना बाजार समित्यांकडून परवाने रद्द करण्याबाबतच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यासंदर्भात आज दुपारी ३ वाजता येवल्यात व्यापाऱ्यांची एक बैठक घेतली जाणारेय. या बैठकीत पुढील भूमिका ठरेल अशी अपेक्षा आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















