एक्स्प्लोर
Trimbakeshwar दर्शन मार्गावर खड्ड्यांचे अडथळे, Dada Bhuse यांच्या Nashik ची दुरवस्था
श्रावण महिन्याला कालपासून सुरुवात झालीय. त्यामुळे भाविकांची त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी रिघ सुरू झालीय. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाकडे जाणारी वाट मात्र बिकट झालीय. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले असून याचा त्रास लाखो भाविकांना सहन करावा लागतोय. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या नाशिकमधील रस्त्यांची ही दुरवस्था आहे. या खड्ड्यांतून कसा मार्ग काढायचा, असा प्रश्न आता भाविकांना आणि इतर प्रवाशांनाही पडलाय
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















